८ वर्ष एयर इंडिया मधे नोकरी केलेली असून, त्या निमित्त अमेरिका, इंग्लंड, युरोप सिंगापूर दुबई, जर्मनी इत्यादी अनेक देशांचा प्रवास त्यांच्या कडून घडला
पुढे त्यांनी नोकरी सोडून पुठ्ठा उत्पादनाचा लघुउद्योग सुरु केला. १९८७ साली महाराष्ट्र शासनातर्फे “सर्वोत्तम लघूउद्योग” म्हणून ‘प्रथम पुरस्कार’ प्राप्त.
दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, तरुण भारत आदी वर्तमानपत्रात करिअर विषयी लेखन करीत असतात, तसेच विद्यार्थ्यांना करिअर संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन देखील करीत असतात.
‘Careers in Science and Technology’, विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील करिअर या विषयी त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
त्यांचे वृत्तपत्रांमधील अनेक लेख, मार्गदर्शन शिबीर व कार्यशाळा या अनेक विषयार्थ्यांना प्रेरणादायी ठरल्या आहे. त्यांनी अनेक मार्गदर्शन कार्यशाळा १०वी नंतर काय ? ११वी - १२वी नंतर काय ? JEE, MHCET अभ्यासाचे नियोजन विषयक कार्यशाळा कराड, सातारा, अमरावती, औरंगाबाद, परळी, सोलापूर, जव्हार (ठाणे), भंडारा, रत्नागिरी, सांगली तसेच दुबई, मस्कत येथे देखील घेतल्या आहे.